किनारपट्टीला धोका कायम : राजनाथ सिंह 

पीटीआय
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

भारताच्या किनारपट्टीला दहशतवादी घटनांचा धोका कायम असून, देशाचे स्थैर्य धोक्‍यात आणण्यासाठी शेजारी देश अशा कारवायांमध्ये गुंतला आहे, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. राजनाथसिंह हे अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

मुंबई (पीटीआय) : भारताच्या किनारपट्टीला दहशतवादी घटनांचा धोका कायम असून, देशाचे स्थैर्य धोक्‍यात आणण्यासाठी शेजारी देश अशा कारवायांमध्ये गुंतला आहे, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केला. राजनाथ सिंह हे अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

"प्रत्येक देशाकडे पुरेशी सुरक्षा यंत्रणा असणे आवश्‍यक आहे. भारताच्या किनारपट्टीला दहशतवादी कारवायांपासून धोका असल्याची शक्‍यता आम्ही नाकारत नाही. आपला शेजारी देश अस्थिरता माजविण्यासाठी वारंवार कारस्थाने करीत आहे. मात्र, देशाच्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आपले नौदल सक्षम असून, मुंबई हल्ल्यासारखी घटना पुन्हा घडणार नाही,' असे राजनाथ सिंह म्हणाले. 

राजनाथ सिंह हे एक रात्र आयएनएस विक्रमादित्यवर होते. या वेळी त्यांच्या उपस्थितीत नौदलाने युद्धसराव केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajnath Singh said that India's coast are threatens for ever