Uttar Pradesh News : पदवी मिळाली म्हणजे यश निश्चित नाही, कौशल्य आणि आत्मविश्वासच खरी ओळख निर्माण करतात; राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये विद्यार्थ्यांना दिला मोलाचा संदेश

Education Degree vs Skills: Rajnath Singh's Message to Students : पदवीमुळे नोकरीची पहिली संधी मिळते, मात्र कौशल्य, आत्मविश्वास आणि सतत शिकण्याची वृत्ती व्यक्तिमत्त्व घडवते, असे राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.
: Rajnath Singh's Message to Students

Rajnath Singh's Message to Students

esakal

Updated on: 

लखनौ : पदवीमुळे नोकरीची पहिली संधी मिळू शकते; मात्र व्यक्तीची खरी ओळख तिच्या कौशल्यांमुळे, आत्मविश्वासामुळे आणि सतत शिकण्याच्या वृत्तीमुळे निर्माण होते, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. रविवारी (२२ नोव्हेंबर) लखनौ येथील एका खासगी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पदव्या आणि पदकांनी गौरवण्यात आले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Loading content, please wait...