DRDOने फक्त ४५ दिवसात उभारली ७ मजली इमारत, राजनाथ सिंहांनी केलं उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DRDOने फक्त ४५ दिवसात उभारली ७ मजली इमारत

७ मजली इमारतीचे बांधकाम ४५ दिवसात होण्याचा हा विक्रम असून देशात पहिल्यांदा असं झालंय.

DRDOने फक्त ४५ दिवसात उभारली ७ मजली इमारत

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) ने बेंगळुरूत एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये फ्लाइट कंट्रोल सिसटिमसाठी ४५ दिवसात ७ मजली इमारत उभा केली. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली असून राजनाथ सिंह यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या सात मजली इमारतीत भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमाने तयार करम्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुविधा असणार आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, DRDOने ADE, बेगळुरुत फ्लाइट कंट्रोल सिस्टिमसाठी हायब्रिड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक ७ मजली इमारत बांधली आहे. विशेष म्हणजे फक्त ४५ दिवसात या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. इमारतीत अद्ययावत अशा सुविधांसह लढाऊ विमानांच्या बांधणीसाठीच्या AMCA प्रोजेक्टवर काम केले जाणार आहे.

AMCA प्रोजेक्टच्या सुरुवातीच्या विकासासाठीचा खर्च हा अंदाजे १५ हजार कोटी इतका सांगण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले होते की, AMCA योजनेच्या डिझाइन आणि नमुना विकासासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील संरक्षण प्रकरणाच्या मंत्रिमंडळ समितीची मंजुरी घेण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

हेही वाचा: Covaxin च्या 2 डोसनंतर Covishield बूस्टर घेतल्यास अ‍ॅन्टीबॉडीज 6 पटीने वाढतात

इमारतीसाठी पायाभरणी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात १ फेब्रुवारीला झाली. या योजनेतील एका अधिकाऱ्याने म्हटलं की, हायब्रिड टेक्नॉलॉजीसह उभारण्यात आलेली ही इमारत आता वापरण्यासाठी तयार आहे. ७ मजली इमारतीचे बांधकाम ४५ दिवसात होण्याचा हा विक्रम असून देशात पहिल्यांदा असं झालंय.

Web Title: Rajnath Singh To Inaugurate 7 Storey Complex Built In 45 Days In Bengaluru

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rajnath SinghIndiaDRDO
go to top