राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांना खंडणीसाठी धमकी

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील भाजप आमदार व राजकिय लोकांना 10 लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या कुटुंबाला तीन दिवसात संपवू अशा प्रकारचे खंडणीसाठी धमकी देणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आले आहेत. कुख्यात गन्हेगार दाऊद इब्राहीम याचा हस्तक असल्याचे सांगून तब्बल 12 आमदारांना धमक्या देण्यात आल्या आहेत.

नोएडा : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांना व्हॉट्सअॅपवर खंडणीसाठी धमकी देणारा मेसेज पाठविण्यात आला आहे. पंकज सिंह हे उत्तर प्रदेशातील नोएडा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. 25 मे ला त्यांच्या मोबाईलवर अज्ञान नंबरवरून मेसेज आला होता.
या प्रकरणी नोएडा सेक्टर 20 पोलिस स्टेशनचे मनीष सक्सेना यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 384 नुसार खंडणी व कलम 507 नुसार अनामीक संवादाद्वारे धमकी देणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हाची नोंद केली आहे. हे प्रकरण सायबर सेलकडे सोपविण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील भाजप आमदार व राजकिय लोकांना 10 लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या कुटुंबाला तीन दिवसात संपवू अशा प्रकारचे खंडणीसाठी धमकी देणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आले आहेत. कुख्यात गन्हेगार दाऊद इब्राहीम याचा हस्तक असल्याचे सांगून तब्बल 12 आमदारांना धमक्या देण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पोलिस तपास पथक (एसआटी) तयार केले आहे. त्यांना त्वरीत तपास करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: rajnath Singh's son gets extortion threats on whatsApp