VIDEO - राहुल गांधींशी चर्चेनंतर सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीनंतर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयपूर - राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीनंतर सचिन पायलट यांनी म्हटलं की, मला कोणत्याही पदाचा लोभ नव्हता. पक्ष पद देऊ शकतो तर ते काढूनही घेऊ शकतो. ज्या लोकांनी कष्ट केलं त्यांनाही सरकारमध्ये जागा मिळायला हवी. आमची लढाई ही पदासाठी नव्हती तर ती सन्मानासाठी होती. पक्षाला आमचं म्हणणं सांगायचं होतं. आता आमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे आणि यावर एक समिती स्थापन करण्यात येईल. गेल्या काही काळापासून आमचे काही आमदार दिल्लीत होते. काही प्रश्न होते त्याकडे लक्ष वेधून घ्यायचं होतं. मी तेच केलं. मला नेहमीच वाटतं की पक्षाच्या हितासाठी असं करणं गरजेचं आहे असंही सचिन पायलट म्हणाले. 

दरम्यान, काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी सचिन पायलट यांचे स्वागत करताना म्हटलं की, सचिन पायलट वेलकम बॅक, राजस्थान भवनाची वास्तू तुमची वाट बघत आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या पूर्ण टीमचे अभिनंदन. अशोक गेहलोत यांना विसरून चालणार नाही. त्यांचा राजकीय अनुभव फसण्याची शक्यता दुर्मीळ आहे. 

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव केसी वेणुगोपाल राव यांनी म्हटलं की, सचिन पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांच्याकडे सविस्तर म्हणणे मांडले. दोघांमध्येही स्पष्ट आणि निर्णायक अशी चर्चा झाली आहे. सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सरकारच्या हिताचं काम करतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajsthan congress crisis sachin pilot reaction