esakal | Breaking: सचिन पायलट पोहोचले, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot and gehlot

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही सचिन पायलट यांनी गुरुवारी भेट घेतली. पायलट यांच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे आमदार  बैठीकत एकत्र दिसणार आहेत. 

Breaking: सचिन पायलट पोहोचले, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर - गेल्या महिन्याभरापासून राजस्थानात सुरु असलेला राजकीय संघर्ष सचिन पायलट आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीने थांबला. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही सचिन पायलट यांनी गुरुवारी भेट घेतली. काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक होणार होती. त्याआधी सचिन पायलट गेहलोत यांना भेटले. पायलट यांच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे आमदार या बैठीकत एकत्र दिसणार आहेत. 

अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट यांच्या गटातील आमदारांच्या झालेल्या एकत्रित बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आधीच्या वक्तव्यांबद्दल माफीही मागितली. तर पायलट समर्थक आमदारांनी कसोटी सामना अखेर रद्द झाल्याचे सांगितले.

अशोक गेहलोत म्हणाले होते की, 'जे झालं ते सर्वजण विसरुन जाऊ, काही चुकलं असेल तर माफ करा. राज्याच्या हितासाठी काम करू आणि पुढे जाऊ. लोकशाहीच्या हितासाठी काम करुया असंही गेहलोत यांनी म्हटलं होतं.

सचिन पायलट समर्थक आमदार विश्वेंद्र सिंह म्हणाले की, कसोटी सामना होता आणि तो अनिर्णित राहिला आहे. आम्ही बंडखोर नाही, आम्ही पक्षाच्या विरोधात कोणतंच पाऊल उचललं नाही. मी सहज म्हटलं होते की, हा कसोटी सामना आहे. पण, आता तो अनिर्णित राहिला असून आम्ही सर्वजण तंबूत परतलो असेही त्यांनी सांगितलं.