
नवी दिल्ली : ‘‘हक्काच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांची २०११ पासून लढाई सुरू आहे. मात्र व्यापारीधार्जिणे धोरण आणि व्यवस्थेकडून शोषण सुरू आहे. अल्पदरात सोयाबीन , कापूस, हरभरा, तूर, मक्का,भात विकावा लागल्याने शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने किमान हमीभावाचा कायदा मंजूर करावा,’’ अशी आग्रही मागणी एमएसपी गॅरंटी मोर्चातर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज केली.