नवी दिल्ली - राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावरून शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सभागृहातील वादाची परिणती अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले..धनकड हे शेतकरी कुटुंबातील असल्याने काँग्रेस त्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे शेतमजुर कुटुंबातील असल्याचे सांगत काँग्रेसने भाजपवर प्रतिहल्ला करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला..विरोधी पक्षांच्या ६० सदस्यांनी धनकड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव राज्यसभेच्या मुख्य सचिवांकडे दिला आहे. हा प्रस्ताव अजूनही चर्चेला आला नाही. परंतु आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी २६७ नियमानुसार स्थगन प्रस्ताव देण्यावरून नाराजी व्यक्त केली..गेल्या ३० वर्षात जेवढे स्थगन प्रस्ताव आले नाही त्याच्यापेक्षा अधिक स्थगन प्रस्ताव माझ्या कारकिर्दीत आले. अध्यक्षांचे कथन सुरू असताना भाजपचे राधामोहन अग्रवाल यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी खासदार अग्रवाल यांनी धनकड यांच्या विरोधात काँग्रेसने आणलेल्या प्रस्तावाला एक वेदनादायी घटना असल्याचे सांगितले..ते म्हणाले, ‘धनकड एक शेतकरी पुत्र असल्याने काँग्रेसने त्यांच्या विरोधात नेहमीच वेगळा सूर लावतात. काँग्रेस एका कुटुंबाशिवाय दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे मोठेपण सहन करू शकत नाही. काँग्रेसने नेहमीच राज्यघटनेची पायमल्ली केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना चांगली वागणूक दिली नाही.’.भाजपचे खासदार नेहरूंवर टीका करू लागल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षाचे सदस्य उभे राहून घोषणा देऊ लागले. परंतु खासदार अग्रवाल यांनी भाषण सुरू ठेवले. यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी या भाषणाला विरोध करीत हे लांच्छनास्पद आरोप कसे करू शकतात, असा सवाल केला..कोणत्या नियमानुसार सदस्यांना बोलण्यास परवानगी दिली जात आहे, अशी विचारणा विरोधकांकडून केली जात होती. सर्व विरोधक घोषणा देऊ लागले. परंतु अध्यक्ष विरोधकांकडे लक्ष देत नव्हते. अखेर तृणमूल काँग्रेसचे गटनेते डेरेक ओब्रायन हे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे गेले व तेथून त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू द्या, असे म्हणून लागले..यावर अध्यक्षांनी खासदार ओब्रायन यांच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला. तुम्ही तेथे का नाचत आहात? असा सवाल केला. अध्यक्ष पुन्हा भाजपच्या सदस्यांना बोलण्याची अनुमती देऊ लागले. खासदार अग्रवाल यांच्यानंतर सुरेंद्र सिंग नागर, नीरज शेखर व किरण चौधरी यांनीसुद्धा अध्यक्ष ‘किसान का बेटा’ असल्याने काँग्रेसतर्फे लक्ष्य केले जात असल्याचा राग आळवला..तुम्ही सधन कुटुंबातून आला आहात : खर्गेराज्यसभेत आज अध्यक्ष धनकड हे शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने त्यांना लक्ष्य केले जात असल्याच्या आरोपाचे उत्तर देताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘‘ अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी तर शेतमजुराचा मुलगा आहे. एवढेच नव्हे तर एका दलित कुटुंबात माझा जन्म झाला आहे. तुम्हाला आमच्या कष्टाची जाणीव नाही. तुम्ही चांगल्या सधन कुटुंबातून आला आहात. भाजपचे सदस्य हेतुपुरस्सर सोनिया गांधी आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही कोणत्या नियमानुसार भाजपच्या सदस्यांना बोलण्याची परवानगी देत आहात. तुम्ही त्यांना बोलण्यास प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. ’’.भाजपचे हात रक्तरंजित : संजयसिंहअध्यक्षांनी ‘आप’चे संजय सिंह यांना बोलण्याची परवानगी दिली. यावेळी ते म्हणाले, भाजपला आता शेतकऱ्यांचा मुलगा आठवत आहे. भाजपचे हात ७०० शेतकऱ्यांच्या खुनाने (रक्ताने) रंगलेले आहेत. आपल्या रास्त मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना मारण्याचे पाप भाजपने केल्याचा हल्लाबोल खासदार संजय सिंह यांनी केला. खासदार सिंह यांच्या भाषणाने भाजपचे सदस्य अधिक आक्रमक झाले. ते समोर येथून घोषणा देऊ लागले..तुम्ही चर्चेला या : अध्यक्ष धनकडया गोंधळातच अध्यक्ष धनकड हे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना चर्चा करण्यासाठी माझ्या कक्षात येण्याचे वारंवार आवाहन करीत होते. या स्थितीत कामकाज चालविणे कठीण असून सभागृहाचे नेते जे. पी. नड्डा व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी माझ्या कक्षात येऊन चर्चा करावी यातून मार्ग काढता येईल, अशी विनंती ते करीत होते. तुम्ही नियमाप्रमाणे अविश्वास ठराव दिला. तो नियमाप्रमाणे चर्चेला येईल. परंतु त्यापूर्वी तुम्ही माध्यमांत माझी बदनामी केली. सभागृहातील या गोंधळात द्रमुकचे नेते तिरुची शिवा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सदस्यांच्या विरोधात बोलण्यापूर्वी पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याने सदस्यांनी सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संदर्भातील विधाने कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. यावेळी दोन्ही बाजूंचे सदस्य एकमेकांच्या विरोधात घोषणा देत होते. यात अध्यक्ष धनकड यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.