राज्यसभेतील गणिते बदलणार; काँग्रेसचे विरोधी नेतेपदही जाणार?

काँग्रेसची अवस्था वरिष्ठ सभागृहातही दयनीय होणार असून या पक्षाची संख्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक त्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे.
rajyasabha
rajyasabha

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह ४ राज्यांतील विजयामुळे राज्यसभेत भाजप याच महिन्याच्या अखेरीस शतक ओलांडेल व वर्षभरात हा पक्ष त्या पदासाठी लागणाऱ्या १० टक्के जागांच्या अगदी जवळ येईल. पंजाबात ऐतिहासिक बहुमत मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे बळ ५ जागांनी वाढून या पक्षाचे राज्यसभेत ८ खासदार होतील. काँग्रेसची अवस्था वरिष्ठ सभागृहातही दयनीय होणार असून या पक्षाची संख्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक त्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे.

२४३ संख्येच्या राज्यसभेत भाजपचे ९७ सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीत बंपर विजयाचे पीक घेणारा हा पक्ष राज्यसभेत शंभरापार जाण्याची शक्यता आहे. यात नजीकच्या काळात आणखी ७ जागांची भर पडेल व २०२२ च्या अखेरीस भाजपचे बळ किमान १२३ जागांवर जाणार आहे. उत्तर प्रदेशातील ३, आसाम, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमधील कॉंग्रेसच्या प्रत्येकी एकेक जागा भाजप हिसकावून घेईल. केजरीवाल यांच्या पक्षाला राज्यसभेतही लॉटरी लागणार आहे. त्यांना पंजाबातून आणखी किमान ५ खासदारांचे बळ मिळेल. पंजाबात यावर्षी दोन टप्प्यांत ५ राज्यसभा जागांसाठी निवडणूक होत आहे.

काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा व शमशेरसिंग डुलो, अकाली दलाचे सुखदेवसिंग ढिंढसा व नरेश गुजराल और भाजपचे श्वेत मलिक यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. यातील एकही सदस्य पंजाबातून पुन्हा राज्यसभेत दिसण्याची शक्यता नाही. ढिंढसा यांनी भाजपशी युती केली होती. या महिनाअखेर १३ जागांसाठी निवडणूक होत आहे.आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, नागालँड व त्रिपुरा येथील सदस्य निवृत्त होतील. त्यातील केरळ वगळता अन्य राज्यांतून भाजप व ‘आप’चे जास्तीत जास्त सदस्य राज्यसभेवर निवडून येतील.

काँग्रेसचे संख्याबळ ३४ पर्यंत घसरले

सध्या काँग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ ३४ पर्यंत घटले आहे. त्यामुळे हा पक्ष विरोधी पक्षनेत्यासाठीच्या सदस्य संख्येच्या गदी जवळ येईल. यंदा काँग्रेस किमान ७ जागा गमावण्याची चिन्हे आहेत. आता गुजरात व पुढील वर्षी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा धुव्वा उडाला तर काँग्रेसची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची खुर्चीही जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com