Rajyasabha Live Updates: प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचाराचा काँग्रेस निषेध करते- गुलाम नबी आझाद

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 3 February 2021

कृषी कायद्यावरुन संसदेतील वातावरण तापलं आहे

नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन संसदेतील वातावरण तापलं आहे. संसदेच्या बजेट सत्राचा आज तिसरा दिवस असून शेतकरी कायद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेता गुलाम नबी आझाद यांनी १९ पक्षांसोबत मिळून शेतकरी मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे राज्यसभेत शेतकरी आंदोलना आणि कृषी कायद्याच्या मुद्द्यावर १५ तास चर्चा करण्यावर सहमती झाली आहे. 

लाईव्ह अपडेट

-- प्रजासत्ताक दिनी हिंसाचारासाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. आमचा पक्ष दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध करतो. पण, चुकीच्या प्रकरणांमध्ये शेतकरी नेत्यांना गोवले जाऊ नये. तसेच कृषी कायदे मागे घेतले जावेत, असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले

-गृह मंत्रालयाने संसदेला सूचित केले की, गाझीपूर, चिल्ला, टिकरी आणि सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीतील नागरिकांना आणि शेजारी राज्यांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. तसेच कोणत्याही आंदोलनामुळे लोकांच्या आणि सरकाच्या संपत्तीचे नुसकान होत असते. 

-राज्यसभेतून एकदिवसासाठी निलंबित झालेले आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी शत्रू राष्ट्राचे नागरिक नाहीत. दिल्ली सीमा चीन-पाकिस्तानच्या सीमेसारखी वाटत आहे. सरकार शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणत आहे, काठीने हल्ला करत आहे. त्यामुळे आम्ही संसदेत विरोध दर्शवला, असं ते म्हणाले आहेत. 

- राज्यसभेत झालेल्या गोंधळानंतर आम आदमी पक्षाच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. खासदार संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि एन.डी. गुप्ता यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.  सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रपती अभिभाषणावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता, आपच्या तीन खासदारांनी जागेवर उभे रहात घोषणा दिल्या. त्यांनी कृषी कायद्यासंबंधी घोषणा दिल्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajyasabha Live Updates farmer protest aap mp venkaiya naidu