Parliament Updates: विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ; उद्यापर्यंत कामकाज तहकूब

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 2 February 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याद्वारे केंद्रीय बजेट 2021 सादर केल्यानंतर आज संसदेचे बजट सत्र बोलावण्यात आले.

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याद्वारे केंद्रीय बजेट 2021 सादर केल्यानंतर आज संसदेचे बजट सत्र बोलावण्यात आले. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी बजेट आणि शेतकरी आंदोलनाप्रकरणी राज्यसभेत गोंधळ घातला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शेतकरी आंदोलनाविषयी बुधवारी चर्चा केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कामकाज स्थगित करावे लागेल.

लाईव्ह अपडेट-

-  शेतकरी मुद्द्यावरुन होत असलेल्या गोंधळामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा बुधवारी होईल, असं ते म्हणाले आहेत. 

-राज्यसभेचे कामकाज दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे

- शेतकरी आंदोलनाप्रकरणी राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ. राज्यसभा 11.30 वाजेपर्यंत स्थगित

- कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन खासदारांचा गोंधळ, राज्यसभा 10.30 वाजेपर्यंत स्थगित

- कृषी कायद्यावरुन संसदेत याआधी चर्चा झाली आहे, चर्चा झाली नसल्याचा चुकीचा समज पसरवला जात आहे. लोक आपला तर्क लावू शकतात, पण प्रत्येक पक्षाने आपले काम पूर्ण केले आहे आणि सूचना दिल्या आहेत- राज्यसभा सभापती
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajyasabha Parliament LIVE Updates farmer protest budget