"पैज लावून सांगतो, कोरोनाची तिसरी लाट येणार नाही"

Rakesh Jhunjhunwala
Rakesh Jhunjhunwala
Summary

गुंतवणूक क्षेत्रात राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं मोठं नाव आहे. झुनझुनवाला यांनी सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

नवी दिल्ली- गुंतवणूक क्षेत्रात राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं मोठं नाव आहे. झुनझुनवाला यांनी सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. देशातील कोरोना स्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. भारताचे वॉरेन बफेट म्हणून राकेश झुनझुनवाला यांना ओळखलं जातं. त्यांच्या तिसऱ्या लाटेसंबंधी वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (Rakesh Jhunjhunwala said corona third wave will not come in india)

मी तुम्हाला पैजेवर पैसे लावून सांगू शकतो की, भारतात इतक्यात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही, असं राकेश झुनझुनवाला म्हणाले आहेत. देशावर कोरोना महामाराचे संकट घोंघावत आहे. दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरी तिसऱ्या लाटेची भिती गुंतवणूकदारांमध्ये आहे. या संदर्भात राकेश झुनझुनवाला यांनी आपलं मत व्यक्त केलं. 'कोरोनाच्या दोन लाटा येतील असं भाकित देशात कोणीही केलं नव्हतं. पण, आता सर्वजण तिसरी लाट येईल, अशी भविष्यवाणी करत आहेत. पण, सध्याचा देशातील लसीकरणाचा वेग पाहता. लवकरच देशात हर्ड इम्युनिटी तयार होईल. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येईल असं वाटत नाही', असं ते म्हणाले.

Rakesh Jhunjhunwala
भारतातील पहिला ई-हायवे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर

झुनझुनवाला पुढे म्हणाले की, सोशल मीडियावर काही लोक तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत आहेत. त्यामुळे आपल्यात भीतीचे वातावरण आहे. पण, देशात कोरोनाची तिसरी लाट येईल असं मला वाटत नाही. मी यासाठी पैजेवर पैसे लावण्यासही तयार आहे. शिवाय लाट आली काय किंवा न आली काय, भारतीय अर्थव्यवस्था कसल्याची संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही.

Rakesh Jhunjhunwala
भावी मुख्यमंत्रिपदावरून कॉंग्रेसमध्ये वाद

दरम्यान, देशात लसीकरणाचा वेग वाढला आहे. सोमवारी देशात लसीकरणाचा विक्रम झाला. एका दिवसात 85 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात किमान 28 कोटी लोकांना लशीचा किमान पहिला डोस मिळाला आहे. दररोज 1 कोटी लोकांना लस देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोरोना लसीकरणाचा हाच वेग कायम असल्याच लवकरच हर्ड इम्युनिटी निर्माण होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com