हा तर भाजपच्या क्षुद्र राजकारणाचा नमुना - राकेश टिकैत

rakesh tikait
rakesh tikaite sakal
Summary

शेतकऱ्यांवर अत्याचार आणि अन्याय होत असून याविरोधात देशभरातील शेतकरी आणि तरुणांना जागरूक करणार असल्याचंही टिकैत म्हणाले.

लखनऊ - लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) हिंचासाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राला (Ashish Mishra) उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर १८ जानेवारीला निर्णय राखून ठेवला होता. आता जामीन मिळाल्यानंतर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राकेश टिकैत यांनी म्हटलं की, लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणात मंत्री अजय टेनी यांचा मुलगा आशिषला जामीन मिळाला. हा तर भाजपच्या क्षुद्र राजकारणाचा नमुना आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्ही वरच्या न्यायालयात अपील करणार आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार आणि अन्याय होत असून याविरोधात देशभरातील शेतकरी आणि तरुणांना जागरूक करणार असल्याचंही टिकैत म्हणाले.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. पाच हजार पानांच्या आरोपपत्रात एसआयटीने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी ठरवलं होतं. तसंच घटनेवेळी आशिष मिश्रा तिथे होता असंही एसआयटीने म्हटलं आहे. आऱोपपत्रात आशिष मिश्राशिवाय आणखी १४ आरोपींची नावे आहेत.

लखीमपूर खेरीमध्ये तिकुनियात झालेल्या हिसांचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्राच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं होतं. यात चार शेतकरी ठार झाले होते. या घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com