ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

जेठमलानी यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारपणाशी लढत होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांचा मुलगा महेश जेठमलानी हेही प्रसिद्ध वकील आहेत. 

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील, कायदेतज्ज्ञ व माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी (वय 95) यांचे आज (रविवार) सकाळी दीर्घ आजारपणाने निधन झाले.

जेठमलानी यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारपणाशी लढत होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांचा मुलगा महेश जेठमलानी हेही प्रसिद्ध वकील आहेत. 

राम जेठमलानी यांचा जन्म सिंध प्रांतातील शिखारपूर येथे 14 सप्टेंबर 1923 मध्ये झाला होता. त्यांनी जिल्हा न्यायालये, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले लढले. 1959 मध्ये महाराष्ट्रात चाललेल्या नानवटी खटल्यापासून ते चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी अनेक हायप्रोफाईल खटले लढविले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची, शेअर मार्केटमधील हर्षद मेहता आणि केतन पारेख, जेसिका लाल हत्या प्रकरणातील आरोपी मनू शर्मा असे अनेक खटले त्यांनी लढविले. सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांचेही ते वकील होते. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणात ते अमित शहांचे वकील होते. 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. मुंबईतून ते भारतीय जनता पक्षाकडून खासदारही होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात त्यांनी कायदामंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Jethmalani eminent lawyer passes away