esakal | ram mandir bhumi pujan live : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्यानगरीत दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Ram mandir

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन

ram mandir bhumi pujan live : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्यानगरीत दाखल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अयोध्यामध्ये राम मंदिर उभारण्याची  देशवासियांची 492 वर्षांची प्रतिक्षा आज (बुधवार) संपणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करुन राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. 11 वाजता मोदी साकेत महाविद्यालयाच्या ग्राउंडवर विमानातून उतरली. त्यानंतर ते थेट हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतील. हनुमानाचे आशिर्वाद घेतल्यानंतर ते  बहुप्रतीक्षित राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी रवाना होती. या परिसरात मोदी वृक्षारोपणही करण्याचा कार्यक्रम नियोजित आहे. 

अयोध्या नगरीतील समारोह लाईव्ह:

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पंतप्रधान मोदींचे केले स्वागत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या नगरीत दाखल

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही अयोध्येत दाखल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती कार्यक्रमस्थळी दाखल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून अयोध्याच्या दिशने रवाना

अयोध्या भूमिपूजनाच्या समारोहास सज्ज

देशभरात उत्साहाचे वातावरण

गाझियाबाद : भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. गाझियाबादमध्ये लोकांनी भजन म्हणत आजच्या ऐतिहासिक दिवसाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. 

हनुमान गढीतील सॅनिटायझेशन प्रक्रिया पूर्ण 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम हनुमान गढीतील हनुमानाचे दर्शन घेणार आहेत. कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. 

पंतप्रधानांसोबत युपीचे मुख्यमंत्रीही राहणार उपस्थितीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामलल्लांचे दर्शन घेतील. त्यानंतर ते राममंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करतील. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्यासोबत असतील.

वाशिंग्टनमध्येही उत्साहाचे वातावरण

वॉशिंग्टन येथील कॅपिटॉल हिल परिसरात वसलेल्या भारतीय नागरिकांनी भगव्या झेंडा हातात घेऊन राम मंदिराच्या भूमिपूज सोहळ्याची उत्सुकतेने प्रतिक्षा करत असल्याचे पाहायला मिळाले. एएनआयने यासंदर्भातील फोटो शेअर केले आहेत. यातून देशातच नव्हे तर परदेशातही या सोहळ्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.