रायबाग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या मेखळी येथील राम मंदिर मठाच्या (Ram Mandir Math) लोकेश्वर स्वामीला (Lokeshwar Swami) पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे अनेक कारनामे पुढे आले आहेत. हा मठ त्याने सरकारी गायरान जमिनीत अवैधरीत्या थाटल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रायबाग तालुका प्रशासनाने हा मठ तीन बुलडोझर लावून गुरुवारी (ता. २९) सकाळी जमीनदोस्त केला.