esakal | राम मंदिराचे पुजारी आणि सुरक्षेसाठी तैनात 16 पोलिसांना कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Ram_Janmabhoomi.jpg

उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये 5 ऑगस्ट रोजी राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. याआधीच एक त्रासादायक बातमी समोर आली आहे.

राम मंदिराचे पुजारी आणि सुरक्षेसाठी तैनात 16 पोलिसांना कोरोना

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये 5 ऑगस्ट रोजी राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. याआधीच एक त्रासादायक बातमी समोर आली आहे. राम जन्मभूमी मंदिराचे पुजारी प्रदीप दास आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या 16 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रदीप दास राम मंदिराचे मुख्य पुजारी सतेंद्र दास यांचे शिष्य आहेत. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी तेही उपस्थित राहणार होते.  

अँटी कोरोना मिठाईसह बेकर्स देतायत 'इम्युनिटी संदेश'
राम मंदिराचे सध्या चार पुजारी आहे. ज्यात मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्यानंतर प्रदीप दास यांचा क्रमांक लागतो. पुजाऱ्यासह 16 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने मंदिर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत. त्यामुळे या घटनेला मोठे महत्व आहे. 

राम मंदिराच्या निर्माणाचे कार्य लवकरच सुरु होणार असल्याने चर्चा वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत 5 तारखेला पंतप्रधान मोदी यांच्या हातून भूमिपूजन केले जाणार आहे. त्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरु केले जाणार आहे. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी केली जात आहे. सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील स्थिती वाईट असताना मंदिराचे भूमिपूजन केले जात आहे. त्यामुळे खूप कमी लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मोदी पहिली विट रचून मंदिराचे भूमिपूजन करतील. 

भूमिजनाच्या कार्यक्रमाला सर्वसामान्य लोकांना परवानगी नसणार आहे. मंदिराची जबाबदारी असलेल्या राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने सर्वसामान्य लोकांना भूमिपूजनाच्या दिवशी अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे. कार्यक्रमाला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव व्यंकटेश यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २७) झालेल्या बैठकीत याबाबत सूचना देण्यात आल्या. शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घाटांचे सुशोभीकरणही करण्यात  येत आहे.

राफेल उडवणार पाकिस्तान आणि चीनची झोप; शेजाऱ्यांच्या तुलनेत भारताची ताकद किती?
भूमिपूजनाचा कार्यक्रमाचे मंदिर स्थळाहून थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार असल्याने मोठे पडदे उभारण्यात येत आहेत. संपूर्ण शहरासह आसपासच्या परिसरात रामनामाचा जयघोष ऐकू यावा यासाठी तीन हजारपेक्षा जास्त ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. अयोध्या व फैजाबाद येथे ४ व ५ ऑगस्ट रोजी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. येथील प्रमुख मंदिरे व स्थळे विजेच्या दिव्यांची व पारंपरिक दिव्यांची रोषणाईने उजळणार आहेत.

(edited by-kartik pujari)