

अयोध्या : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्याला उद्या, मंगळवारी (ता. ३) सुरुवात होत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी आज शरयू तीरावर भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी अयोध्या सज्ज झाली असून, दहशतवादविरोधी पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले.