esakal | राम मंदिराला चेक स्वरुपात दिलेले 15000 चेक बाऊन्स
sakal

बोलून बातमी शोधा

ram mandir

राम मंदिराला देणगी म्हणून मिळालेले 15,000 चेक बाऊन्स

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राम मंदिरासाठी देणगी म्हणून देण्यात आलेले 22 कोटी रुपयांचे तब्बल 15,000 चेक बाऊंस झाले आहेत. राम मंदिर निर्माणासाठी बनवण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संबंधित खात्यांमध्ये पैसे नसणे किंवा ओवररायटिंग आणि स्वाक्षरीमध्ये मिसमॅच अशा चुकांमुळे चेक बाऊंस झाले आहेत. ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितलं की, यासंबंधी चर्चा सुरु आहे. शिवाय तांत्रिक अडचणींना दूर करुन पैस ट्रान्सफर करुन घेण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.

मिश्रा यांनी सांगितलं की, ज्यांनी जारी केलेले चेक बाऊंस झाले आहेत, अशा सर्वांना आपली चूक सुधारण्यासाठी संधी देण्यात येईल. ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी सांगितलं की, 15 हजार चेक बाऊंस झाले आहेत, त्यातील जवळपास 2 हजार चेक अयोध्यामधूनच गोळा करण्यात आले आहेत. याशिवाय दूसरे 13000 चेक देशातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. बाऊंस झालेले चेक आम्ही परत करत आहोत आणि देणगी देणाऱ्यांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी नवीन चेक जारी करावेत. असे असले तरी चेक बाऊंस होण्याची संख्या खूप मोठी आहे.

हेही वाचा: अयोध्या : राम मंदिर बांधकामाच्या उत्खननात सापडल्या पादुका

विश्व हिंदू परिषद आणि त्याच्याशी संबंधित अन्य संघटनांकडून राम मंदिरा निर्माणासाठी देणगी गोळा करण्यासाठी अभियान सुरु करण्यात आले आहे. अभियान 15 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत सुरु होते. या अभियानातून 2500 कोटी रुपये देणगी मिळाल्याचे सांगितले जाते. ट्रस्टने यासंबंधी अधिकृत कोणताही आकडा सांगितलेला नाही. अयोध्या निर्माणसाठी सर्वाधिक देणगी राजस्थान राज्यातून मिळाली असून ती 515 कोटी रुपये आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांचं म्हणणं आहे की, जवळपास अडीच एकर जागेवर केवळ मंदिर बनवले जाईल.

हेही वाचा: 70 नाही तर 107 एकर जागेवर उभे राहणार भव्य राम मंदिर; ट्रस्टने खरेदी केली जमीन

राम मंदिराचे निर्माण कार्य 2024 च्या आत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वादात अडकलेले हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने निकाली काढले होते. कोर्टाने वादग्रस्त जागेवर राम मंदिरा बांधण्यास परवानगी दिली, तर इतर ठिकाणी मश्चिद बांधण्यास सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.