Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी, खरगेंनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण; चार हजार संतही राहणार उपस्थित

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे
ram temple inauguration ceremony mallikarjun kharge sonia gandhi get invitations marathi news
ram temple inauguration ceremony mallikarjun kharge sonia gandhi get invitations marathi news
Updated on

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येमध्ये हा कार्यक्रम २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असणार आहेत.

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडून खरगे, सोनिया गांधी यांच्यासोबतच लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार की नाही याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाहीये .

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आमि चौधरी यांना वयक्तिकरित्या निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सोहळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आमि एचडी देवगौडा यांना देखील बोलवण्यात आले आहे. ट्रस्टच्या प्रतिनीधी मंडळाने हे निमंत्रण दिलं आहे. येत्या काही दिवसात इतर विरोधी पक्षातील नेत्यांना देखील निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे.

ram temple inauguration ceremony mallikarjun kharge sonia gandhi get invitations marathi news
Corona Variant JN.1 : चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव; ‘जेएन.१’चा देशातील दुसरा रुग्ण सिंधुदुर्गमध्ये

ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार विविध परंपरांच्या पूज्य संतांसोबत प्रत्येक क्षेत्रात देशाचं नाव उंचावणाऱ्या सर्व प्रमुख व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. तसचे नव्या तीर्थक्षेत्रपुरम (बाग बिजैसी) मध्ये एक टेंट सिटी स्थापन करण्यात आळी आहे, ज्यमाध्ये सहा ट्यूबवेल, सहा स्वयंपाकघर, आणि दहा बेडचं रुग्णालयाचा देखील समावेश आहे. देशात तब्बल १५० डॉक्टर या रुग्णालयात एकापाठोपाठ एक अशा पध्दतीने सेवा देणार आहेत. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यात विविध सांप्रदायांच्या तब्बल ४,००० संतांना निमंत्रण देण्यात आले आहे.

ram temple inauguration ceremony mallikarjun kharge sonia gandhi get invitations marathi news
Pakistan: पाकिस्तानमध्ये माजी सरन्यायाधीशांच्या घरावर हल्ला; नवाज शरीफांना ठरवलं होतं अपात्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting
ayodhya ram mandir julan utsav
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Swami Govind Dev Giri
Marathi News Esakal
www.esakal.com