लोकसभेत 350 जागा जिंकणार, पटनायकांनी NDA मध्ये सामील व्हावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale Naveen Patnaik

नितीश कुमार यांनी अलीकडच्या काळात एनडीएची साथ सोडलीय.

लोकसभेत 350 जागा जिंकणार, पटनायकांनी NDA मध्ये सामील व्हावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी सुप्रीमो नवीन पटनायक (Odisha CM Naveen Patnaik) यांना भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होण्याचं आवाहन केलंय. तसं झाल्यास त्यांच्या प्रादेशिक पक्षाला याचा मोठा फायदा होईल, असा दावा त्यांनी केलाय.

आठवले म्हणाले, बिजू जनता दलानं (Biju Janata Dal) एनडीए सरकारला खूप मदत केलीय. संसदेच्या दोन्ही सभागृहात अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात त्यांनी मदत केली. नवीन पटनायकांनी एनडीएशी हातमिळवणी केल्यास 2024 च्या निवडणुकीत बीजेडीला मोठा फायदा होईल. शिवाय, केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार ओडिशासाठी अधिक निधी मंजूर करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आठवले यांच्या वक्तव्यावर बीजेडी नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीय.

हेही वाचा: Karnataka : मुख्यमंत्रिपदाची 'खुर्ची' 2500 कोटींना विकली; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

नितीश पुन्हा NDA सोबत येतील : आठवले

2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) एनडीए मोठ्या संख्येनं पुढं येईल, असं रामदास आठवलेंनी म्हटलंय. नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी अलीकडच्या काळात एनडीएची साथ सोडली. परंतु, भविष्यात त्यांचा पक्ष पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग होऊ शकतो, असं भाकित आठवलेंनी केलंय. नितीश कुमार यांच्या जाण्यानं आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाहीय. पुढील लोकसभा निवडणुकीत एनडीए किमान 350 जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा: Britain PM Election : माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही, पण मी मागं हटणार नाही : ऋषी सुनक

Web Title: Ramdas Athawale Offered Odisha Cm Naveen Patnaik To Join Nda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..