'राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर येईल'

वृत्तसंस्था
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची केली विनंती.

मुंबई : राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यावर अमित शहा यांनी काळजी करू नका. भाजप-शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल, असे सांगितले आहे. असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

राज्यात सरकार स्थापनेवरून विविध पक्षातील राजकीय नेतेमंडळींकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता सरकार स्थापनेवरून रामदास आठवले यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून अमित शहा यांना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर अमित शहा यांनी राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन होईल. काळजी करू नका, असे सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale Request to Amit Shah for Government Formation Issue