Ramleela where Snake God is crowned instead of Ram
Sakal
देश
Ramleela Uttarakhand: रामलीलेत राम नाही, नाग देवतेचा राज्याभिषेक! उत्तराखंडमधील १२२ वर्षांची अनोखी परंपरा, नक्की भेट द्या
Unique Ramleela tradition: रामलीला म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो प्रभू रामाचा जयघोष आणि अयोध्येच्या सिंहासनावर होणारा त्यांचा राज्याभिषेक.
Ancient Ramleela festival in Uttarakhand villages: रामलीला म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो प्रभू रामाचा जयघोष आणि अयोध्येच्या सिंहासनावर होणारा त्यांचा राज्याभिषेक. परंतु, उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील भटवाडी विकासखंडांतर्गत येणाऱ्या गोरशाली गावात एक अत्यंत वेगळी आणि ऐतिहासिक रामलीला साजरी केली जाते.
या रामलीलेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, येथे रामलीलेच्या शेवटी रामाच्या पात्राला नव्हे, तर साक्षात वासुकी नाग देवतेला प्रतीकात्मकरीत्या राजतिलक लावून राज्याभिषेक केला जातो. टिहरी संस्थानाच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जात आहे.

