BSP : रामपूर लोकसभा पोटनिवडणूक बसपा लढवणार नाही; मायावतींचा मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSP Chief Mayawati

विधानसभेतील पराभवानंतर बसपानं आतापासूनच महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केलीय.

BSP : रामपूर लोकसभा पोटनिवडणूक बसपा लढवणार नाही; मायावतींचा मोठा निर्णय

बहुजन समाज पक्षानं (Bahujan Samaj Party) राज्यात यंदा होणाऱ्या नागरी निवडणुकांची तयारी सुरू केलीय. त्यासाठी पक्षानं रणनीती तयार केली असून त्याअंतर्गत पक्ष नवीन सदस्य जोडणार आहे. पक्षानं महानगरपालिकच्या 1000 UP (Municipal Election), पालिका परिषद 500 आणि नगर पंचायतींच्या 300 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात लखनौमध्ये बसप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बसपा सुप्रीमो मायावती (BSP Chief Mayawati) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत स्थानिक निवडणुकांबाबत नेत्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: 'त्यांचं' अंतर्वस्त्र भगवं झालंय; न्यायमूर्तींबाबत PFI नेत्याचं वादग्रस्त विधान

मिळालेल्या माहितीनुसार, बसपा प्रमुख मायावतींनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात लखनौमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीत नागरी निवडणुकांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत बसपानं (BSP) सर्वात वाईट कामगिरी केलीय. त्यानंतर नागरी निवडणुकांसाठी मायावती सक्रिय झाल्या आहेत. याचवेळी मायावतींनी उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघात (Rampur Lok Sabha Constituency) होणारी पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा: समान नागरी कायदा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही; 'जमियत'मध्ये ठराव

पक्षप्रमुख मायावतींनी प्रदेशाध्यक्ष भीम राजभर, प्रदेश प्रभारी मुंकद अली, विजय प्रताप गौतम, राजकुमार गौतम यांच्यासह राज्यातील 18 विभागांच्या 36 प्रभारींसोबत बैठक घेतली. त्यांनी प्रथम प्रत्येक मंडळात संघटनेच्या विस्ताराबाबत चर्चा केली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील (UP Assembly Election) पराभवानंतर, पक्ष आपल्या राजकीय अस्तित्वासाठी लढत आहे. बसपाला नागरी निवडणुकांकडून मोठ्या आशा आहेत. कारण, गेल्या नागरी निवडणुकीत पक्षानं चांगली कामगिरी करून दोन महापालिकांमध्ये महापौरपद पटकावलं होतं. त्यामुळं यावेळीही बसपा चांगली कामगिरी करू शकेल, असं वाटत आहे. त्यामुळं त्यांनी आतापासूनच महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केलीय.

Web Title: Rampur Parliamentary Seat Bye Election Bsp Not To Contest Mayawati Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top