Diwali: हृदयद्रावक! दिवे लावून झोपले अन् बसमध्येच...; ड्रायव्हर-क्लीनरची ठरली शेवटची दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali: हृदयद्रावक! दिवे लावून झोपले अन् बसमध्येच...;  ड्रायव्हर-क्लीनरची ठरली शेवटची दिवाळी

Diwali: हृदयद्रावक! दिवे लावून झोपले अन् बसमध्येच...; ड्रायव्हर-क्लीनरची ठरली शेवटची दिवाळी

देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मात्र, ऐन सणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. रांचीमध्ये बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरची अखेरची दिवाळी ठरली. (Ranchi Fire In A Bus Parked At Khadagada Bus Stand Two People Burnt To Death )

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर हे दोघे दिवे लावून झोपले होते. त्यामुळे रात्री अचानक बसला आग लागली. यामुळे दोघांचा होरपळून मृत्यू झाला.

बसला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली होती. पोलिसांनी बसमध्ये सापडलेल्या अर्धावस्थेत जळालेले दोन मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत.

टॅग्स :Diwali Festivalranchi