Ranchi IT Park: रांचीत १०० एकरवर उभा राहणार हायटेक IT पार्क, तब्बल ७५ हजार तरुणांना नोकऱ्या!

Ranchi IT Park, GCC, 75,000 Jobs : रांचीमध्ये २०२९ पर्यंत अत्याधुनिक IT Park सुरू करण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात सुमारे २० हजार रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. पुढील तीन वर्षांत रोजगार संधींची संख्या सुमारे ७५ हजारांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे.
ranchi it park

ranchi it park

esakal

Updated on: 

रांची :झारखंडची राजधानी रांचीला देशातील प्रमुख टेक आणि इनोव्हेशन हब बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि RMZ Infrastructureचे अध्यक्ष दीपक छाबडिया यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रांचीत अत्याधुनिक IT पार्क आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) उभारण्याबाबत चर्चा झाली. हा प्रकल्प २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन असून, पुढील टप्प्यांत सुमारे ७५ हजार उच्च-कौशल्याधारित रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com