

Ranchi plans 135 modern public toilets with separate facilities for women and transgender people, along with breastfeeding rooms.
esakal
रांची : झारखंडची राजधानी रांचीमधील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी महानगरपालिकेने महत्त्वाची योजना आखली आहे. शहरातील रस्त्यांवर आणि विविध चौकांमध्ये असलेली जुनी मॉड्यूलर शौचालये टप्प्याटप्प्याने हटवून त्यांच्या जागी १३५ कायमस्वरूपी आधुनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी प्रत्येक शौचालयाच्या प्रकारानुसार ३० ते ३२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या योजनेत ६५ सार्वजनिक शौचालये, ५० सामुदायिक शौचालये आणि २० अत्याधुनिक शौचालयांचा समावेश आहे. या शौचालयांमध्ये महिला, पुरुष आणि तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. तसेच मातांसाठी स्तनपान कक्ष, सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी यंत्रणा, स्नानगृह आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या सुविधाही असतील.