

riims cath-lab-facility-will-start-soon-at-ranchi
esakal
झारखंड: झारखंडची राजधानी रांची येथील हृदयविकाराच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. रांची सदर रुग्णालयात लवकरच अत्याधुनिक कॅथलॅब आणि कार्डिॲक केअर युनिट सुरू करण्यात येणार आहे. पुढील १५ ते २० दिवसांत सिव्हिल काम पूर्ण करण्याचे आणि येत्या चार महिन्यांत ही सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि पेसमेकर प्रत्यारोपणासारखे उपचार सरकारी रुग्णालयात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.