‘रँचो’ची शाळा अद्याप ‘सीबीएसई’ला संलग्न नाही

अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर या वर्षी मंजुरी मिळण्याची आशा
Rancho school is not yet affiliated with CBSE
Rancho school is not yet affiliated with CBSE

नवी दिल्ली : अभिनेता आमीर खान याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘थ्री इडियट्‌स’ या २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दाखविलेली लडाखमधील द्रुक पद्‌मा कार्पो ही शाळा अद्यापही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न होण्याच्या प्रतिक्षेत आहे. यासाठी या शाळेने काही वर्षांपूर्वीच अर्ज केला आहे. या शाळेला जम्मू-काश्‍मीर मंडळाने मंजुरी दिली असल्याने या वर्षी ती ‘सीबीएसई’ला जोडली जाईल, अशी आशा शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

Rancho school is not yet affiliated with CBSE
Bank Fraud : ED ची मोठी कारवाई; जप्त केली 26.59 कोटींची रोकड, दागिने

चित्रपटात दाखविली गेल्यापासून ही शाळा ‘रँचो’ची शाळा म्हणून ओळखली जात आहे. ही शाळा वीस वर्षांपूर्वी सुरु झाली आहे. या शाळेत मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध प्रयोग केले जातात. ‘सीबीएसई’शी संलग्न होण्यासाठी कोणत्याही शाळेला त्या राज्याच्या शिक्षण मंडळाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवावे लागते. द्रुक पद्‌मा कार्पो ही शाळा सध्या जम्मू काश्‍मीर राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. शाळेला या मंडळाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आता मिळाले आहे. ‘आम्ही अनेक वर्षांपासून ‘सीबीएसई’शी संलग्न होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्व आवश्‍यक पायाभूत सुविधा, चांगला निकाल, संशोधन आणि शिक्षणावर भर या सर्व अटी आमची शाळा पूर्ण करत असतानाही राज्य शिक्षण मंडळाकडून अनेक वर्षे आम्हाला प्रमाणपत्र मिळत नव्हते. अखेर या महिन्यात मंजुरी मिळाल्याची सरकारी कागदपत्रे आमच्या हातात आली आहेत. आता कोणताही अडथळा येणार नाही, अशी आशा आहे,’ असे शाळेच्या मुख्याध्यापिका मिंगूर ॲग्मो यांनी सांगितले.

Rancho school is not yet affiliated with CBSE
Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद

लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरही येथील शाळा अद्यापही जम्मू-काश्‍मीर शिक्षण मंडळाशीच संलग्न आहेत. येथील शाळांसाठी स्वतंत्र शिक्षण मंडळ स्थापन करण्यासाठी समितीची स्थापना झाली आहे.

‘इडियॉटिक वॉल’

पंधराव्या शतकातील विचारवंत पेमा कार्पो यांच्या नावावरून शाळेचे नामकरण करण्यात आले आहे. नावातील पद्‌मा कार्पो म्हणजे स्थानिक बोठी भाषेत पांढरे कमळ. ‘थ्री इडियट्‌स’ चित्रपटाच्या अखेरच्या दृश्‍यामध्ये या शाळेची एक भिंत दाखविण्यात आली होती. २०१० मध्ये आलेल्या पुरात या भिंतीसह शाळेचे नुकसान झाले होते. विटांपासून बनविलेली ही भिंत नंतर लडाखमधील बांधकाम पद्धतीनुसार लाकडापासून बनविण्यात आली. भिंत पहायला येणाऱ्या पर्यटकांचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून २०१८ मध्ये तिची जागाही बदलण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com