सरकारने प्रियांका गांधींचा फोन हॅक केला; सुरजेवाला यांची टीका

वृत्तसंस्था
Sunday, 3 November 2019

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला असून, त्यामध्ये त्यांचा फोन हॅक होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला असून, त्यामध्ये त्यांचा फोन हॅक होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. हे सर्व सरकारकडून केले जात आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (रविवार) केली.

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 1400 लोकांचा फोन हॅक करण्याबाबत माहिती सध्या मिळत आहे. सत्ताधारी भाजप सरकारने प्रियांका गांधी यांचाही फोन हॅक करण्यास सांगितले, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून काँग्रेसने याप्रकरणी भाजपच्या संस्थांकडून जी काही बेकायदेशीरपणे चौकशी सुरु आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयात चौकशी केली जावी, असे सांगितले. 

भारतातील लोकांना हॅकिंगबाबत गुरुवारी सकाळी धक्कादायक माहिती समजली. यामध्ये काही पत्रकार, न्यायाधीश, वकील, कार्यकर्त्यांचे फोन हॅक करण्यात आले. तसेच यामध्ये विरोधी पक्षातील अनेक नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांच्या फोनचा समावेश असल्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Randeep Surjewala on Phone Hacking Issue