Corona Guidelines : विमानतळांवर आजपासून पुन्हा सुरू होणार कोरोना चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona test

Corona Guidelines : विमानतळांवर आजपासून पुन्हा सुरू होणार कोरोना चाचणी

चीनमध्ये वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येनंतर केंद्र सरकारने वेळीच सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. वाढत्या रूग्णससंख्येच्या पार्श्वभूमीवर आज वरीष्ठ अधिकारी आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

या बैठकीत चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. तसेच भारतातील सध्याच्या स्थितीचाही अभ्यास करण्यात आला. दरम्यान, जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

काय म्हणाले अदर पुनावाला....

दरम्यान, चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येत कोविशील्ड लस निर्माते अदर पुनावालांनी ट्वीट करत मोठं विधान केले आहे. पुनावाला म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाची संख्या पुन्हा एकदा वाढणे चिंताजनक आहे. मात्र, कोरोना विरोधातील भारतात झालेले लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता वाढत्या रूग्णसंख्येत भारतीयांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये. परंतु, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर विश्वास ठेवून त्याचे पालन करणे आवाहन पुनावाला यांनी नागरिकांना केले आहे.