बापरे! आतड्यांच्या दुर्मिळ ब्लॅक फंगसचे दोन नवे रुग्ण

बापरे! आतड्यांच्या दुर्मिळ ब्लॅक फंगसचे दोन नवे रुग्ण

नवी दिल्ली : एकाबाजूला देशात कोरोनाचं (Corona Crisis) भलंमोठं संकट घोंघावत असताना दुसरीकडे आता म्युकरमायकॉसिसचं (Mucormycosis) एक नवं संकट आ वासून उभं राहिलं आहे. हे संकट आता इतकं गहिरं होत चाललं आहे की, या आजाराचा समावेश आता साथरोग कायद्यात करण्यात आला असून यास महामारी घोषित करण्यात आलं आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतून आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. म्युकरमायकॉसिस अर्थात ब्लॅक फंगसचा (Rare Black Fungs) दुर्मिळ प्रकार आता आढळून आला आहे. लहान आतड्यांमध्ये आढळणारा हा दुर्मिळ प्रकार आता सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये आढळला आहे. वय वर्षे 56 आणि 68 वर्षांच्या दोन वयस्कर लोकांना हा दुर्मिळ म्युकरमायकॉसिस झाला आहे. या दोन्ही रुग्णांना कोरोना तसेच मधूमेहाचा त्रास आहे. मात्र, यातील एकाच पेशंटवर स्टेरॉईड्सचा वापर करण्यात आला होता. (Rare cases of Mucormycosis Black Fungs of small intestine seen in Delhi)

बापरे! आतड्यांच्या दुर्मिळ ब्लॅक फंगसचे दोन नवे रुग्ण
'चला, वाजवा थाळ्या', ब्लॅक फंगससाठीही मोदी लवकरच करतील घोषणा

सुरुवातीला त्या दोघांच्याही पोटात खूप दुखत होतं. अखेर डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आणि त्यामध्ये दोघांच्याही छोट्या आतड्यांना म्युकरमायकॉसिसमुळे छीद्र पडल्याचं दिसून आलं आहे. हा ब्लॅक फंगसचा दुर्मिळ प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर आता तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिसचे वास्तव :

- उपचाराचा खर्च खुपच जास्त असल्याने काही रूग्ण उपचार न घेताच परततात

- उपचारासाठी केवळ इंजेक्शन नव्हे तर निष्णात सर्जनची आवश्यकता

- दीर्घकाळ चालणाऱ्या या उपचारांत एका रुग्णाला १५०च्या वर इंजेक्शनची गरज भासते

- जिथे गरज आहे तिथे इंजेक्शनचा पुरवठा कमी

- सरकारच्या योजनांमध्ये काही खासगी हॉस्पिटलचा समावेश नाही

- योजनांची घोषणा झाली आहे पण प्रत्यक्षात किती जणांना लाभ मिळाला, हे अजूनही अनुत्तरीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com