tajmahal secret chamber open shah jahan mumtaz mahal orginal kabar free entry
sakal
जगातील सातवे आश्चर्य मानल्या जाणाऱ्या ताजमहालमध्ये लवकरच मुघल सम्राट शहाजहान यांचा ३७१ वा उर्स साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने १५ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान पर्यटकांसाठी ताजमहालचे दरवाजे विनामूल्य उघडले जातील. विशेष म्हणजे, वर्षभरातून केवळ या ३ दिवसांसाठीच ताजमहालच्या तळघरात असलेल्या शहाजहान आणि मुमताज महल यांच्या मूळ कबरी पर्यटकांना पाहता येणार आहेत.
भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) जारी केलेल्या आदेशानुसार, उर्सच्या कालावधीत पर्यटकांना आणि भाविकांना विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.