

Nature’s Miracle: Snowfall in Yamunotri During Peak Summer of May
Sakal
उत्तरकाशी : उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री धाम येथे निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळाला आहे. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात जिथे संपूर्ण देश होरपळत आहे, तिथे यमुनोत्रीमध्ये पावसासह चक्क हिमवर्षाव (Snowfall) झाला आहे. या आल्हाददायक वातावरणामुळे चारधाम यात्रेसाठी आलेल्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हवामानातील या बदलामुळे उत्तराखंडच्या पर्वतीय भागात हिवाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.