आमची थट्टा चाललीये! 41 मजुरांना बोगद्यातून बाहेर काढणाऱ्या रॅट होल मायनर्संनी बक्षीस नाकारलं

उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारे रॅट होल मायनर्संनी त्यांना मिळालेले बक्षीस स्वीकारण्यास नकार दिलाय.
tunnel rescue
tunnel rescue

नवी दिल्ली- उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारे रॅट होल मायनर्संनी त्यांना मिळालेले बक्षीस स्वीकारण्यास नकार दिलाय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून त्यांना ५० हजार रुपयांचा चेक दिला जात होता. पण, चेक घेण्यास नकार दिला असून त्यांच्या कामाच्या तुलनेत हे पैसे खूप कमी असल्याचं म्हटलं आहे.

रॅट होल मायनर्सच्या टीम प्रमुखाने म्हटलं की, सरकार देऊ करत असलेली रक्कम पुरेशी नाही. जेव्हा सर्व प्रयत्न करुन झाले तेव्हा आम्हाला बोलावण्यात आलं. त्यावेळी आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून कोणत्याही शर्तींशिवाय मॅन्युअल ड्रिगिंग केली आणि मजुरांना बाहेर काढलं. त्यामुळे आम्ही सरकार देऊ करत असलेल्या रकमेबाबत समाधानी नाही. (Rat hole miners hailed for Uttarakhand tunnel rescue refuse to encash govt cheques)

tunnel rescue
Israel Hamas War: हमासला मोठा धक्का! इस्राइलला मिळाला 'सर्वात मोठा बोगदा', पहा व्हिडीओ

रॅट होल मायनिंगमध्ये १२ लोकांची टीम होती. या सर्वांनी राशी घेण्यास नकार दिला. जेव्हा त्यांना चेक देण्यात आला होता, तेव्हाच त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी एक दोन दिवसात मोठी घोषणा करु असं आश्वासन त्यांना अधिकाऱ्यांनी दिलं होतं. पण, त्यांच्याकडून याची पूर्तता झाली नाही. रॅट होल मायनर्संनी त्यांच्यासाठी स्थिर नोकरीची अपेक्षा केली आहे.

tunnel rescue
"मी काल परत मंदिरात गेलो कारण..."; 41 मजुरांचे प्राण वाचवणारे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांची भावनिक प्रतिक्रिया

रॉकवेल इंटरप्रायजेससाठी काम करणारे आणि मजुरांपर्यंत सर्वात आधी पोहोचणारे मुन्ना म्हणाले की, मजुरांना वाचवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि सरकारकडून देण्यात आलेले रक्कम पुरेशी वाटत नाही.

घर किंवा नोकरीची अपेक्षा

मजुरांना वाचवण्यासाठी आम्ही जीव धोक्यात घातला. कुटुंबियांचा विरोध असताना आम्ही दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी तेथे गेलो. त्यामुळे आम्हाला देण्यात आलेली ५० हजार रुपयांची राशी खूप कमी आहे.आम्हाला सरकारकडून एक स्थिर नोकरी किंवा घराची अपेक्षा होती, असं टीमकडून म्हणण्यात आलंय. दरम्यान, १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ४१ मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आले. या ऑपरेशनमध्ये रॅट मायनर्स हे हिरो ठरले होते. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com