रतन टाटा यांची भावनिक पोस्ट...'त्या' जखमा कधीच भरणार नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रतन टाटा यांची भावनिक पोस्ट...'त्या' जखमा कधीच भरणार नाहीत
रतन टाटा यांची भावनिक पोस्ट...'त्या' जखमा कधीच भरणार नाहीत

रतन टाटा यांची भावनिक पोस्ट...'त्या' जखमा कधीच भरणार नाहीत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

26/11 ला मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली. मुंबईत अतिरेक्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस, लिऑपोल्ड कॅफे, हॉटेल ऑबेरॉय, कामा हाऊस, मेट्रो सिनेमा, चौपाटी आदी ठिकाणी हे दहशतवादी हल्ले झाले. चौपाटीवर अतिरेक्यांच्या झालेल्या झटापटीत अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले. तर, पोलिस हवालदार तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेकांना वीरमरण आले.

यात ताज महाल हॉटेलचेही नुकसान झाले. या हॉटेलवर अडीच दिवस हल्ला करत दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमणाता नासघूस केली. त्यानंतर हे हॉटेल काही काळ बंद होते. पण पुन:निर्माण करून हे हॉटेल पुन्हा सुरू झाले. पण 26-11 च्या स्मृती मात्र अद्याप पुसल्या गेलेल्या नाहीत.

रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. ताजमहाल हॉटेलचा फोटो टाकत त्यांनी लिहीलंय की, 13 वर्षांपूर्वी आपण जो आघात सहन केला तो कधीही पूर्ववत होऊ शकत नाही. तरीही आपण हल्ल्याच्या आठवणी कायम ठेवल्या पाहिजेत. ज्या लोकांनी बलिदान दिले, त्यांचे बलिदान आम्ही नेहमी स्मरणात ठेवू, असे रतन टाटा म्हणाले. त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

loading image
go to top