जमशेदजी टाटा जयंती : Ratan Tata झाले भावूक म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ratan tata gets emotional on the birth anniversary of tata group founder jamsetji tata

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची आज जयंती

जमशेदजी टाटा जयंती : Ratan Tata झाले भावूक म्हणाले...

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा (Tata Group founder Jamsetji Nusserwanji Tata) यांची आज जयंती (Birth Anniversary) आहे. यावेळी रतन टाटा (Ratan Tata) यांनी त्यांची आठवण काढली. त्यांनी सोशल मीडियावर भारतीय उद्योगपती आणि उद्योजकाच्या स्टेच्युशेजारी उभे असलेला आपला फोटो शेअर केलेला आहे. त्याचबरोबर जमशेदजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त रतन टाटा यांनी टाटा समूहातील कंपन्यांशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: राज्यात कोरोनोबाधितांचा उच्चांक ते रतन टाटा पुन्हा आले मदतीला; ठळक बातम्या क्लिकवर

रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) फोटो शेअर करत लिहिले की, "श्री, जमशेदजी नुसरवानजी टाटा यांनी आम्हाला त्यांची प्रेरणा, त्यांची नैतिकता आणि मूल्ये, त्यांची दृष्टी आणि निःस्वार्थीपणा दिला आहे. ज्याने हजारो नागरिकांना प्रतिष्ठा दिलीय. टाटा समूहातील सर्व कंपन्या, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आपल्या संस्थापकाच्या जयंतीच्या शुभेच्छा."

जमशेदजी नुसरवानजी टाटा हे एक भारतीय अग्रणीचे उद्योगपती होते. त्यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी झाला. त्यांनी भारतातील सर्वात मोठी कंपनी टाटा समूहाची स्थापना केली. टाटा समूहाने आज जे मोठे यश मिळवले आहे ते त्यांच्या दूरदृष्टीचे आणि एका व्यक्तीच्या ध्येयाचे फलित होते. जमशेदजी टाटा, ज्यांना "भारतीय उद्योगाचे जनक" देखील मानले जाते.

Web Title: Ratan Tata Gets Emotional On The Birth Anniversary Of Tata Group Founder Jamsetji Tata

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top