

ratapani tiger reserve name change bhim betka travel
esakal
मध्य प्रदेशातील रायसेन आणि सीहोर जिल्ह्यांत पसरलेल्या रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव आता बदलण्यात आले आहे. भीमबेटका येथील जगप्रसिद्ध पाषाण गुहांचा शोध लावणारे महान पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या सन्मानार्थ या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली आहे. भोपाळ येथे आयोजित एका विशेष राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात त्यांनी ही अधिकृत घोषणा केली.