
नवी दिल्ली : वक्फ कायद्यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विचार स्पष्ट नाहीत, अशी टीका भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली. काँग्रेसच्या अहमदाबाद येथे सुरु असलेल्या अधिवेशनात ‘सोनिया गांधी हिंदुस्थान, राहुल गांधी हिंदुस्थान’ अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केली होती. त्याला प्रसाद यांनी आक्षेप घेतला.