
काश्मिरी पंडितांच्या पाठिशी मुस्लीम समाज, मुंबईत मशिदीबाहेर निदर्शनं
जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandit) खोरं सोडलंय. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदूंनी काश्मीर (Kashmir Tagret Killing) सोडल्याचं वृत्त समोर आलं. त्यामुळं काश्मिरातील हिंदू वस्त्या पुन्हा ओस पडू लागल्या आहेत.
दरम्यान या घटना थांबवण्यासाठी रझा आकादमीतर्फे मुंबईतील मिनारा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी मुस्लीम बांधवांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. काश्मीरमध्ये अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी उपस्थितांनी केली. काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे असल्याचं रझा अकादमीचे अध्यक्ष मुहम्मद सईद नूरी यांनी म्हटलंय.
Web Title: Raza Academy Staged A Demonstration Outside Minara Masjid In Mumbai Against Targeted Killings In Kashmir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..