बंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (आरसीबी) आयपीएलमधील विजयोत्सव आता एका शोकांतिकेत बदलला आहे. चेंगराचेंगरीत (Bangalore Stampede) ११ जणांचा बळी गेला आहे. सरकारच्या चुकीमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असा आरोप होत आहे. या घटनेकडे पाहता प्रश्न पडतो की इतक्या घाईघाईने सोहळा करणे आवश्यक होते का? चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांचे नियोजनही विस्कळीत झाले होते. त्यामुळे सरकारविरुद्ध जनतेचा रोष तीव्र होत आहे.