esakal | Delhi Elections : भाजपच्या पराभवाची मालिका आता सुरु : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Elections : भाजपच्या पराभवाची मालिका आता सुरु : शरद पवार

दहशतीविरुद्ध लोकांची मतं  

धार्मिक कटूता वाढेल असे काम

- भाजप ही आपत्ती

Delhi Elections : भाजपच्या पराभवाची मालिका आता सुरु : शरद पवार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला. या विजयामुळे मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही. हा विजय निश्चित होताच. यापूर्वी इतर काही राज्यात भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता दिल्लीतही पराभव झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या पराभवाची मालिकाच सुरु झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, दिल्लीमध्ये करोलबाग येथे मराठी भाषिक आहे. दिल्ली सरकारने पाणीपट्टी कमी केली. मुलांना शिस्तीचे आणि सक्तीच्या शिक्षणाची सोय केली. तसेच दिल्ली देशाच्या इतर शहरापेक्षा वेगळी आहे. दिल्लीचा निर्णय हा दिल्लीपूरता मर्यादित नाही. आपचा या निवडणुकीत विजय होणार होता आणि तो झाला. या विजयामुळे आश्चर्य वाटत नाही. 

दहशतीविरुद्ध लोकांची मतं  

अहंकार जो होतो त्याविरोधात जनता व्यक्त झाली आहे. संसदेतील सदस्य आणि सर्वांमध्ये जी नाराजी आहे आणि हीच नाराजी आता निकालातून समोर येत आहे. दिल्लीसह अनेक राज्यात भाजपचा पराभव होत आहे. आता पराभवाची मालिका सुरु झाली आहे. दहशतीविरूद्ध लोकांनी मतं दिली.

धार्मिक कटूता वाढेल असे काम

धार्मिक कटूता वाढेल असे काम भाजपने केले आहे. मारा, गोळ्या घाला, मर्यादा सोडून घोषणा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भाजपचा पराभव होणार हे निश्चित होते. आता ही मालिका आहे थांबणार नाही. 

भाजप ही आपत्ती

भाजप ही एकप्रकारची आपत्तीच आहे. ती काहीही करून आपण घालवली पाहिजे. दहशतीच्या वातावरणामुळे भाजपचा पराभव झाला.