'हे' आहे भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येपाठीमागचे कारण
आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. भैय्यूजी महाराजांनी केलेल्या आत्महत्येमुळे उलटसुलट चर्चेला सुरवात झाली होती. परंतु, त्यांनी लिहलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्यांनी आपल्यावर आलेल्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही कारणीभूत ठरवू नये असे त्यांनी लिहले आहे.
पुणे - आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. भैय्यूजी महाराजांनी केलेल्या आत्महत्येमुळे उलटसुलट चर्चेला सुरवात झाली होती.
परंतु, त्यांनी लिहलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्यांनी आपल्यावर आलेल्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही कारणीभूत ठरवू नये असे त्यांनी लिहले आहे.
दरम्यान, वर्षभरापूर्वी भैय्यू महाराजांनी दुसऱ्यांदा विवाह केला होता. ३० एप्रिल २०१७ रोजी ग्वालियर स्थित डॉ. आयुषी शर्मा हिच्यासोबत त्यांनी दुसरा विवाह केला होता. आई आणि मुलीच्या काळजीपोटी आपण दुसरा विवाह करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दुसऱ्या विवाहानंतर त्यांच्या घरात तणावाचं वातावरण असल्याचं सांगण्यात येतंय. भैय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नीचं आधीच निधन झालं होतं.