तुमच्या वाट्याचा स्लॉट कोण चोरतंय? वाचा कोविनवरील स्लॉट बुक्ड होण्यामागचं नेमकं कारण

cowin
cowinsakal media

नागपूर : केंद्र सरकारने लसीकरणासाठी कोविन अॅप तयार केले. याद्वारे आपल्याला लसीकरणासाठी स्लॉट बुक करायचा असतो. मात्र, वेबसाईट उघडताच अवघ्या काही सेकंदामध्ये हे स्लॉट बुक होतात किंवा ते आधीच बुक केलेले असतात, अशा अनेक तक्रारी पुढे आल्यात. स्लॉट कधी सुरू होईल हे कोणालाही माहिती नसते. मात्र, ज्यावेळी खरंच स्लॉट सुरू होणार असेल त्यावेळी कोविन पोर्टलवरून लगेच लॉगआउट केले जाते. स्लॉट उपलब्ध असूनसुद्धा बुक्ड होत नाही. त्यावर क्लिक केल्यानंतरही लॉग आउट होत असल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या. पण, कोविनवर स्लॉट बुक करताना नेमक्या या समस्या का येतात? स्लॉट बुक का होत नाही? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. त्यासाठी आपल्याला लसीकरणाची पद्धती समजून घ्यावी लागेल.

cowin
कोरोनासाठी अनोखा ‘इलेक्ट्रिक मास्क’; शुद्ध हवेसाठी उपयुक्त

लसीकरणासाठी नोंदणी -

देशात १० जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातील फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षांच्या वर असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यापासूनच रजिस्ट्रेशनची प्रक्रियाही सुरू केली. यासाठी केंद्र सरकराने एक वेबसाइट तयार केली ती म्हणजे कोविन (कोविड व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क). लस घेण्यापूर्वी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपला मोबाइन क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर त्यावर एक ओटीपी येतो. तो ओटीपी टाकल्यानंतर आपला मोबाइल क्रमांक व्हेरीफाय केला जातो. त्यानंतर आधार कार्ड डिटेल्स टाकल्यानंतर नोंदणी केली जाते. लसीकरणाचा स्लॉट बुक करण्यासाठी एक कॅलेंडर दिलेले असते. आपण ज्या परिसरातील आहोत त्या परिसरातील पिन कोड टाकून स्लॉट उपलब्ध आहेत की हे सुद्धा बघता येतंय. दिलेल्या तारखेवर संबंधित सेंटरवर जाउन आपल्याला लस घ्यायची असते. लसीकरणाची ही प्रक्रिया इतकी सोप्पी आहे, असं म्हणता येईल. पण, नेमक्या त्याबाबतच अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.

१८ वर्षांवरील लसीकरण सुरू झालं अन् कोविन वेबसाईट कोलमडली -

१ मेपासून १० वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येईल, अशा घोषणा करण्यात आली. मात्र, त्यासाठी कोविनवर नोंदणी बंधनकार करण्यात आली. १८ वर्षांवरील लसीकरणामुळे ४५ वयाच्या वरील नागरिकांच्या लसीकरणामध्ये कुठलाच अडथळा येणार नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आले. मात्र, १८ वर्षांवरील नागरिकांना लसीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आल्याने सुरुवातीच्या एक-दोन दिवसातच कोविन साईट ट्रॅश झाली. त्यानंतर सरकारने त्यामध्ये काही अपडेट आणले. तरीही लसीकरणासाठी स्लॉट काही बुक्ड होईना. कारण याचठिकाणी अनेकांनी हॅकींग केल्याचे प्रकार समोर आलेत. हॅकर्सने असे एक तंत्र विकसित केले, की काही सेकंदात कॉम्प्युटर प्रोग्रामच्या सहाय्याने सर्व स्लॉट बुक्ड होतात, असे एका संकेतस्थळाने केलेल्या अभ्यासातून समोर आले.

cowin
DRDO च्या 2DG औषधाचा यापूर्वीही झालाय वापर; जाणून घ्या सविस्तर

लसींचा स्लॉट हॅक होतोय?

एका संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, एका विशेष प्रोग्रामिंगच्या सहाय्याने कोविनला हॅक करण्यात आले. हॅकर्स एका विशेष स्क्रिप्टला या अॅपवर चालवतात. स्क्रिप्ट म्हणजे एका दुसऱ्या अॅपसोबत चालणारा एक छोटासा प्रोग्राम. या स्क्रिप्टच्या माध्यमातून स्लॉट उघडताच संपतो आणि आपल्यापैकी अनेकजण मात्र 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट'नुसार प्रयत्न करत असतो.

आपल्यासारखे सामान्य व्यक्ती १०-१२ वेळा कोविनवर स्लॉट शोधून थकून जातात. मात्र, हे स्क्रिप्ट कोविनवर स्लॉट उपलब्ध आहे की नाही हे सातत्याने शोधत असते. स्लॉट ओपन होताच हॅकर्सला अलर्ट मिळत असतो. सामान्य व्यक्तींप्रमाणे हॅकर्सला स्वतःच्या डेटा देखील भरावा लागत नाही. हे सर्व काम स्क्रीप्ट प्रोग्रामिंग करत असते. त्यामुळेच आपण बुक्ड करण्यापूर्वीच स्लॉट संपलेले असतात, असे त्या संकेतस्थळाचे म्हणणे आहे.

API ची हॅकींगमध्ये महत्वाची भूमिका?

API म्हणजे अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. हे दोन अॅप किंवा त्यांच्या सर्व्हरमधील दुआ असतो. API द्वारे मेसेज आणि माहिती सर्वत्र पोहोचवली जाते. कोविनवरील हॅकींग होत असेल तर ती APIमुळेच शक्य होऊ शकते. कारण लोकांना थर्ड पार्टीकडून देखील स्लॉटची उपलब्धता कळावी यासाठी कोविन बनविणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने स्वतः API ला सार्वजनिक केले आहे. त्यामुळे पेटीएमसारखी अनेक अॅप आणि संकेतस्थळ स्लॉट उपलब्ध असल्याचे अलर्ट देत असतात. मात्र, हे अलर्ट मिळूनसुद्धा स्लॉट आधीच बुक्ड झालेले असतात, असा अनेकांचा अनुभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com