
प्रयागराज/ महाकुंभनगर (उत्तर प्रदेश) - महाकुंभमेळ्यात सामील होणाऱ्या भाविकांच्या संख्येने उच्चांक प्रस्थापित केला आहे. ११ ते १६ जानेवारी या सहा दिवसांत सात कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. महाकुंभमेळा सुरू होण्यापूर्वी अकरा जानेवारी रोजी सुमारे ४५ लाख भाविकांनी स्नान केले तर १२ जानेवारी रोजी ६५ लाख भाविकांनी स्नान करण्याचा विक्रम केला. याप्रमाणे महाकुंभमेळा सुरू होण्यापूर्वी दोन दिवसांत एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी स्नान केल्याची नोंद झाली आहे.