
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) आज गुरुवारी म्हटलंय की, देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या केल्या गेल्या आहेत. फक्त 24 तासांमध्ये केल्या गेलेल्या आजवरच्या सर्वाधिक चाचण्या (Highest Corona Test) आहेत. एका दिवसात तब्बल 20.55 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. (Recordbreak More than 20.55 million tests of the corona The highest figure to date)
सध्या दैनंदिन संक्रमणाचा भारतातील दर हा 13.44 टक्के आहे. मंत्रालयाने म्हटलंय की, भारतात बुधवारी एकूण 20,55,010 चाचण्या केल्या गेल्या आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही गेल्या सलग सात दिवसांमध्ये नव्या रुग्णांपेक्षा अधिक राहिलेली असून ही दिलासादायक बाब आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 3,69,077 रुग्ण बरे झाले आहेत तर 2,76,110 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत तमिळनाडू राज्यात सर्वाधिक 34,875 रुग्ण आढळले आहेत. तर त्यानंतर कर्नाटकात 34,281 नवे रुग्ण समोर आले आहेत.
एकूण कोरोना रुग्ण - 2,57,72,400
एकूण कोरोनामुक्त - 2,23,55,440
उपचाराधीन रुग्ण - 31,29,878
एकूण मृत्यू - 2,87,122
देशातील कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट टक्केंपेक्षा जास्त आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत दररोज घट होत असून याची टक्केवारी 13 इतकी आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.