रेल्वेत होणार 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती; रेल्वेमंत्र्यांची घोषणा

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार असून, रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

भारतीय रेल्वेत सध्या एक लाख 32 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून, येत्या दोन वर्षांत एक लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे 2 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे सी आणि डी या दोन गटातील जागा आणि आता निघणाऱ्या जागा अशा सर्व जागा मिळून येत्या दोन वर्षांत रेल्वेत सुमारे 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

Web Title: Recruitment to 4 lakh employees in railway Announcement by Rail Minister Piyush Goyal