
दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात आम आदमी पक्षाच्या(आप) बहुचर्चित पुजारी ग्रंथी सन्मान योजनेसाठी आजपासून नोंदणी सुरू झाली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वतंत्रपणे पुजाऱ्यांची नोंदणी केली.