पुन्हा निर्बंध लागू करा

संसर्ग वाढलेल्या जिल्ह्यांबाबत आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
पुन्हा निर्बंध लागू करा
पुन्हा निर्बंध लागू कराEsakal

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणाऱ्या व गेल्या २ आठवड्यांत रुग्णवाढ झालेल्या केरळसह दहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील २७ जिल्ह्यांत पुन्हा कडक निर्बंध लागू करावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. राज्य सरकारांना पाठविलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी रुग्णवाढ असलेल्या जिल्ह्यांत आवश्यकता भासल्यास रात्रीची संचारबंदी लावण्याची सूचना केली आहे. दरम्यान ओमिक्रॉनची रुग्णवाढ महाराष्ट्रात वेगाने होत असल्यानेही केंद्रीय आरोग्य यंत्रणेने राज्याशी सातत्याने संपर्क ठेवला आहे.

ज्या जिल्ह्यांत कोरोना सक्रिय दर ५ ते १० टक्क्यांवर व त्यापेक्षाही पुढे गेला आहे. तिथे गर्दीची ठिकाणे तसेच सामाजिक समारंभ, सण, लग्न, अंत्यविधी आदींमध्ये जास्त गर्दी जमणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याची गरज या पत्रात व्यक्त करण्यात आली असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर कोरोना नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असेल असेही नमूद करण्यात आले आहे.

पुन्हा निर्बंध लागू करा
मुस्लिमांनी स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे - असदुद्दीन ओवैसी : AIMIM Mumbai Rally

या भागावर विशेष लक्ष

भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात ५ ते १० टक्के सक्रिय रूग्णवाढ असलेले केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुद्दुच्चेरी, पश्चिम बंगाल, नागालॅंड व सिक्कीम या राज्यांतील १९ जिल्हे आरोग्य नियम अंमलबजावणीबाबत काळजी घेण्याच्या यादीत आहेत. याशिवाय केरळ, मिझोराम व सिक्कीम या तीन राज्यांतील ८ जिल्ह्यांतील रुग्णवाढीचा दर हा १० टक्क्यांच्यावर आहे.देशात केरळमध्ये अजूनही सर्वाधिक ४३ ते ४५ टक्के सक्रिय रुग्णसंख्या असून हे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे.

केंद्रीय यंत्रणा राज्याच्या संपर्कात

ओमिक्रॉन व्हेरियंटचा देशातील प्रभाव वाढत चालला असून केंद्र सरकारने राज्यांना याही बाबतीत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. देशात आतापर्यंत ३३ रुग्णांना याची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून दिसले. महाराष्ट्रातील सर्वाधिक १७ रुग्ण असल्याने केंद्रीय यंत्रणेने राज्याच्या आरोग्य यंत्रणेशी केवळ ॲमिक्रॉनबाबत दैनंदिन संपर्क ठेवण्यास पुन्हा सुरवात केली आहे.

परदेशातून येणाऱ्यांच्या तपासणीत निष्काळजीपणा नको

रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटविणे

रुग्णवाढ दिसणाऱ्या जिल्ह्यांत चाचण्याही वाढवा

लसीकरणाची गती वाढवावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com