
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर अखेर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड झाली असून, भाजपच्या रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रामलीला मैदानावर पार पडलेल्या या भव्य शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे वरिष्ठ नेते आणि अनेक मंत्री उपस्थित होते.